मुंबईतील जैन मंदिर पाडल्य़ाच्या निषेधार्थ जैन समाज आक्रमक, समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईच्या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगाच्या टीमकडून पाहणी, पोलीस आणि पालिका प्रशासन सोबतच मंदिर प्रशासनाकडून घेतली माहिती.
काँग्रेस नेते हुसेन दलवाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं,काठे गल्ली परिसरातील दर्ग्याच्या पाहणीसाठी गेले असताना अडवलं,सदर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
परभणीच्या पाथरीत मानवी हक्क अभियानच्या पदाधिकाऱ्यांचं 7 दिवसांपासून साखळी उपोषण, शिंदेंच्या शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा, भूखंड घोटाळा प्रकरणात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात तत्काळ SIT चौकशी सुरू करण्याची आंदोलकांची मागणी
पालघरच्या डहाणू तहसील कार्यालयावर धडक मोर्चा,जन सुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली मोर्चा,यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
अनधिकृत भोंगे आणि मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या ॲक्शन मोडवर,घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यात जात सोमय्यांकडून तक्रार दाख, त्यानंतर अनधिकृत भोंगे आणि मोशीदिबाबत पोलिसांच्या कारवाईला सुरुवात